पहिली राष्ट्रीय सागरी खेळ स्पर्धा

महाराष्ट्राच्या खेळाडूंची दमदार कामगिरी

| पाली/बेणसे | वार्ताहार |

4 ते 11 जानेवारी दरम्यान दिव येथे पार पडत असलेल्या बीच गेम्स क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करताना एकूण 3 सुवर्ण 2 रजत 4 कांस्य अशी 9 पदके जिंकून पिंच्याक सिलॅट खेळात महाराष्ट्राचे टॉप थ्री मधील अव्वल स्थान अबाधित ठेवले. दिव बिच गेम्स 2024 मध्ये मल्लखांब, टग ऑफ वॉर, बीच बॉक्सिंग, बीच व्हॉलीबॉल, बीच सॉकर, सी स्विमिंग, बीच कबड्डी आणि पिंच्याक सिलॅट असे एकूण 8 खेळ समाविष्ट करण्यात आले असून त्यात एकूण 1200 खेळाडूंनी सहभाग घेतला आहेत. त्यातील पिंच्याक सिलॅट खेळामध्ये भारतातील विविध राज्यातून निवडण्यात आलेल्या 220 खेळाडूंमध्ये महाराष्ट्र संघात 17 खेळाडू होते.

फाईट इव्हेंट सुवर्णपदक ओमकार नवनाथ सानप (60-65) किलो , पियुष अभय शुक्ला (85-100) किलो, भक्ती शिवाजी किल्लेदार (75-95) किलो वजनी गटातील फाईट इव्हेंटमध्ये सुवर्ण पदक , टँडींग फाईट इव्हेंट व सोलो क्रिएटीव्हीटीमध्ये किर्णाक्षी किशोर येवले हिने (60-65) किलो वजनी गटात दोन रौप्य पदके पटकावली. शुभम गणेश किंगरे (-45), समीक्षा सतीश सावंत (45-50), दिक्षा शंकर शिंदे (70-75) किलो, स्नेहल सचिन डांगे (65-70) यांनी फाईट इव्हेंटमध्ये कांस्य पदके पटकावली.

या स्पर्धेचा उदघाट्न समारंभ 4 जानेवारी रोजी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, दिल्ली लेपटनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना, लडाखचे लेपटनंट गव्हर्नर बी. डी. शर्मा, दिव दमण दादरा नगरहवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल, दिव दमणचे खासदार लालभाई पटेल यांच्या हस्ते पार पडला. बक्षीस समारंभ 7 जानेवारी रोजी दिवच्या जिल्हाधिकारी भानुप्रभा , राष्ट्रीय अध्यक्ष इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर प्रकाश येवले, सेंटर फॉर एक्सलन्स दिवचे संचालक निखील देसाई , दिवच्या महापौर हेमलत्ता बेन, दमन व दिव चे डायरेवटर ऑफ स्पोर्टस अरुण गुप्ता, मोहम्मद इकबाल , दमन दिवचे क्रीडा अधिकारी अक्षय कोटलवार, तारिक अहमद झरगर, फिलिया थॉमस, दिव दमन पिंच्याक सिलॅट असोसिएशनचे सेक्रेटरी एलेक्स थॉमस ह्या पदाधिकार्‍याच्या शुभ हस्ते झाला. या स्पर्धेत प्रशिक्षकाची जबाबदारी ओमकार अभंग, अंशुल कांबळे, पूर्वी गांजवे, अमोल कदम, तृप्ती बनसोडे सुरेखा येवले यांनी पार पाडली.

Exit mobile version