| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
नाशिक- इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशन (आयपीएसएफ) यांच्या मान्यतेने महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशनने (एमपीएसए) 11 वी राष्ट्रीय पिंच्याक सिलॅट वरीष्ठ वयोगटातील महिला व पुरूष स्पर्धा आयोजित केली होती. पालीतील अनुज दत्तगुरू सरनाईक ने या स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली. राष्ट्रीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेत 85 ते 90 वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले..11 व्या राष्ट्रीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा डंका वाजला आहे.त्यामुळे राज्य व देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. सदर स्पर्धा पंचवटीतील मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत एकूण 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश तसेच ऑल इंडीया पोलीस, सी आय एस एफ, आय टी बी पी, एस एस बी संघ असे एकूण 900 खेळाडू सहभागी झाले होते.
या राष्ट्रीय स्पर्धेचे बक्षीस समारंभ नुकताच खासदार हेमंत गोडसे, नितीन ठाकरे, इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले, इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे खजिनदार इरफान भुट्टो, प्रतिभाताई पवार मा नगरसेवका, तृप्ती बनसोडे डायरेक्टर महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशन या मान्यवरांच्या हस्ते पार पडला. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने 7 सुवर्ण, 2 रौप्य , 9 कांस्य पदकासह प्रथम सांघिक विजेतेपद पटकावले, तसेच मणिपूर संघाने 5 सुवर्ण, 1 रौप्य, 4 कांस्य पदकासह द्वितीय स्थानावर आणि जम्मू आणि काश्मीर संघाने 3 सुवर्ण, 2 रौप्य, 3 कांस्य पदकासह तिसरे स्थान पटकावले.
या खेळाचा समावेश गोव्यामध्ये होणार्या 37 व्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये 14 मे 2023 रोजी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने केला आहे. 11 व्या राष्ट्रीय स्पर्धेतून विजयी झालेल्या प्रत्येक वजनगटातील 16 खेळाडूंची निवड गोव्यामध्ये होणार्या 37 व्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी झाली आहे. या खेळामध्ये मागील 11 वर्ष महाराष्ट्र संघ अव्वल स्थानी आहे. त्यामुळे या स्पर्धेत सुद्धा महाराष्ट्र संघातील खेळाडू वर्चस्व राखण्यात यशस्वी झाले.
पिंच्याक सिलॅट खेळ इंडोनेशियन मार्शल आर्टचा क्रीडा प्रकार आहे. टेडिंग (फाईट), तुंगल (सिंगल काता), रेगु (ग्रुप काता), गंडा (डेमो फाईट), सोलो (इव्हेंट) अशा पाच प्रकारांमध्ये हा खेळ खेळला जातो. 1 सप्टेंबर 2020 ला या खेळाचा समावेश केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने आपल्या 5 टक्के राखिव नोकर भरतीमध्ये केला आहे. या खेळाला केंद्र सरकारच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय, भारतीय विश्वविदयालय संघ, अखिल भारतीय पोलीस खेळ नियंत्रण बोर्ड आणि ऑलिम्पिक, काउन्सिल ऑफ एशियाची मान्यता आहे. हा खेळ एशियन गेम, एशियन मार्शल आर्ट गेम, युथ गेम व ऐशियन बिच गेम, भारतीय विश्वविद्यालय, खेळ खेलो इंडिया वुमन्स पिंच्याक सिलॅट लिग अशा अधिकृत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये खेळला जातो.
या स्पर्धेतून 456 खेळाडूंची निवड 37 व्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी करण्यात आली आहे अशी माहिती या खेळाचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले नी दिली विजयी खेळाडूंना शुभेच्छा हेमंत आप्पा गोडसे , किशोर येवले नितीन ठाकरे, प्रतिभा पवार यांनी दिल्या. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नागेश बनसोडे,आकाश धबाडगे,योगेश पानपाटील,अभिषेक अवाड, भरत जाधव,निखील साबळे,रमेश धनगर,ओम मोरे,जयेश पगारे विकास धबडगे,राहुल पगारे, तनिष्क गवई यांनी अथक मेहनत घेतली.