। पाली/बेणसे । धम्मशील सावंत । सुधागड तालुक्यातील राब गावावर ऐन सणासुदीला शोककळा पसरणारी दुःखद घटना घडली. घरगुती देवीचे विसर्जनावेळी शुक्रवारी (ता.15) सायंकाळी 6 च्या दरम्यान सुधागड तालुक्यातील राबगाव येथील 2 तरुणांचा तमोसोली पुलाजवळ अंबा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. शिवेंद्र चौहान (वय 24) सध्या राहणार राबगाव, ता. सुधागड, मूळ राहणार उत्तरप्रदेश, विवेक लहाने (वय 20) राहणार राबगाव. असे मृत तरुणांचे नाव आहे. देवीचे विसर्जन करून नदी पत्रातून किनार्यावर येत असतांना पाय घसरून नदीत पडून हे तरुण बुडाले आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होतेय. या संदर्भात पाली पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे हे करीत आहेत.
सुधागड तालुक्यातील 2 तरुणांचा नदीत बुडून मृत्यू
-
by Krushival

- Categories: sliderhome, सुधागड- पाली
- Tags: drownsmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newssudhagad-pali
Related Content
दहा दिवसाच्या बाप्पाला आज निरोप
by
Krushival
September 25, 2026
Bribe Case: लाचखोर भस्मेचा ‘साहेब’ कोण?
by
Antara Parange
September 24, 2026
अंदाज समिती रायगड दौऱ्यावर
by
Krushival
September 24, 2026
गणेशोत्सवाची परंपरा जगाच्या नकाशावर पोहोचणार
by
Antara Parange
September 24, 2026
रा.जि.प. सीईओंकडून शासन परिपत्रकाच्या आदेशाचा भंग?
by
Antara Parange
September 24, 2026
बँक कर्मचारी संपाच्या पावित्र्यात
by
Antara Parange
September 24, 2026