राज्यातील 20 आमदारांनी घेतली थेट राष्ट्रपतींची भेट?

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
राज्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली आहे. राज्यातील 20 आमदारांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली असल्याचं बोललं जात आहे. मात्र या भेटीमागचे नेमकं कारण काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राज्यातील सर्वपक्षीय 20 आमदारांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सकाळी 11 वाजता राष्ट्रपती भवनात भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. हे 20 आमदार या भेटीमागचं नेमक कारण संध्याकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करतील. तसेच या पत्रकार परिषदेतून अत्यंत महत्त्वाची माहितीही दिली जाणार आहे. विशेष म्हणजे हे सर्व आमदार विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या नेतृत्वात हे सारं करीत असल्यानं झिरवळ यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राज्यातील हे 20 आमदार राज्यातील आदिवासी समाजाच्या प्रश्नांबाबत राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचं बोललं जात होतं. आदिवासी समाजासाठी काही ठोस निर्णय घेण्याची मागणी या भेटीत केली जाणार असल्याचं सांगण्यात येतं. राज्यात धनगर समाजाला आदिवासींच्या प्रमाणे आरक्षणाची मागणी वाढत असताना या भेटीला महत्त्व आलं आहे. राज्यात एकीकडे आरक्षणाचा मुद्दा तापत असताना या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या भेटीत आरक्षणाच्या मुद्द्यावरही चर्चा होऊ शकते, असं सूत्रांनी सांगितलं.

राष्ट्रपतींना भेटणारे हे 20 आमदार
1) नरहरी झिरवळ, विधानसभा उपाध्यक्ष 2) विजयकुमार गावित, मंत्री 3) धर्मराव बाबा आत्राम, मंत्री 4) सुनील भुसारा 5) नितीन पवार 6) दौलत दरोडा 7) किरण लहमटे 8) हिरामण खोसकर 9) शांताराम मोरे 10) सहस्रम करोटे 11) शिरीशकुमार नाईक 12) श्रीनिवास वनगा 13) अशोक उईके 14) कांशीराम पावरा 15) देवराम होली 16) कृष्णा गजभिये 17) दिलीप बोरसे 18) राजेश पडवी 19) के. सी. पडवी 20) आमशा पडवी .

Exit mobile version