जिल्ह्यात दिवसभरात २० मि.मी. पाऊस

| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 20.02 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून 2022 पासून आजअखेर एकूण सरासरी 2 हजार 504.81 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

गुरुवार, दि. 18 ऑगस्ट रोजी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार, तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे. अलिबाग-9.00 मि.मी., पेण-12.00, मुरुड-14.00, पनवेल-12.00, उरण-20.00, कर्जत-20.50, खालापूर-15.00, माणगाव-14.00, रोहा-18.00, सुधागड-14.00, तळा-34.00, महाड-20.00, पोलादपूर-27.00, म्हसळा-26.00, श्रीवर्धन-18.00, माथेरान-46.80 मि.मी. करण्यात आली असून, एकूण पर्जन्यमान 320.30 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 20.02 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 80.76 टक्के इतकी आहे.

जिल्ह्यात मागील वर्षी दि.18 ऑगस्ट 2021 रोजी सरासरी 12.19 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली होती. तसेच दि.01 जूनपासून दि. 18 ऑगस्टअखेरपर्यंत एकूण सरासरी 2 हजार 778.86 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली होती.

Exit mobile version