| पनवेल | वार्ताहर |
ट्रेंडिंग केली तर त्याचा चांगला फायदा होईल असे सांगून 21 लाख 83 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मच्छिंद्रनाथ मुरलीधर गोरे हे बालाजी सिम्फनी, सुकापूर येथे राहतात. ते फेसबुक पाहात असताना शेअर मार्केट लीडर 92 हे पेज त्यांनी क्लिक केले. त्यावेळी त्यांनी त्यांची माहिती सबमिट केली. त्यावेळी व्हॉट्सअप ग्रुपची रिक्वेस्ट आली. ती त्यांनी स्वीकारली. त्यानंतर त्यांना ट्रेडिंगसंदर्भात माहिती देण्यात आली व ग्रुपमधील सदस्यांचे रात्री ऑनलाईन लेक्चर घेऊन त्यामध्ये शेअर मार्केटची माहिती दिली. सुनील सिंघानी आणि करणवीर धिलोन असे नाव सांगणार्या इसमाने फेसबुक आणि व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधून त्यांच्या एएलआयसीई कंपनीमध्ये ट्रेंडिंग केली तर त्याचा चांगला फायदा होऊन असे सांगून केलेल्या गुंतवणुकीच्या प्रॉफिटची रक्कम 87 लाख रुपये मिळण्याकरिता त्यांनी 9.56 लाख रुपये टॅक्स भरले नाही तर तुमच्या खात्यामध्ये प्रॉफिटची रक्कम जमा होणार नाही असे सांगून टप्प्या-टप्प्याने वेगवेगळ्या खात्यावर 21 लाख 83 हजार रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले आणि ती रक्कम परत न करता फसवणूक केली.