2,135 भारतीय युक्रेनमधून बाहेर

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांपैकी रविवारी 2135 भारतीयांना ऑपरेशन गंगा अंतर्गत बाहेर काढण्यात आलं आहे, अशी माहिती नागरी उड्डाण मंत्रालयानं दिली आहे. युक्रेनच्या शेजारील देशांमधून 11 विशेष विमानांद्वारे या भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. ऑपरेश गंगा ही मोहिम युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी संजीवनी ठरली आहे. या मोहिमेद्वारे 22 फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या या विशेष मोहिमेंतर्गत विशेष विमानांद्वारे आजवर 15,900 भारतीयांना सुखरुप मायदेशी आणण्यात आलं आहे.

दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या मऑपरेशन गंगाफ मोहिमेचा शेवटचा टप्पा आजपासून सुरु झाला आहे. यापार्श्‍वभूमीवर भारतीय दुतावासानं युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना लवकरत हंगेरीया सिटी सेंटर, राकोझी युटी 90 आणि बुडापेस्ट या शहरांमध्ये पोहोचण्याचं आवाहन केलं आहे. युक्रेनमधून सध्या 13,300 भारतीय नागरिकांना 63 विमान फेर्‍यांच्या मदतीनं मायदेशी आणण्यात आलं आहे. यांपैकी गेल्या चोवीस तासात 15 विमानं 2,900 भारतीयांना घेऊन भारतात पोहोचली आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं शनिवारी दिली.

Exit mobile version