22 वर्षीय तरुणी बेपत्ता

| पनवेल | वार्ताहर |

राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक 22 वर्षीय तरुणी कुठेतरी निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. कैलाशी नाईक असे तरूणीचे नाव आहे. चेहरा गोल, केस काळे मध्यम, वर्ण गोरा, बांधा मध्यम, डोळे काळे, नाक सरळ असून अंगात गुलाबी रंगाचा वनपिस व पायात काळ्या रंगाच्या सॅण्डल आहेत. या तरुणीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा.

Exit mobile version