| पनवेल | प्रतिनिधी |
कामोठे येथे जाऊन येतो असे सांगून मित्रा सोबत बाहेर पडलेली 20 वर्षीय तरुणी पुन्हा घरी न परतल्याने ती हरवल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. प्रांजलीची उंची 5 फूट 3 इंच असून तीचा चेहरा उभट, केस काळे लांब, नाक सरळ, डोळे काळे, वर्ण गोरा, बांधा सडपातळ, दोन्ही कानामध्ये रिंग घातलेले आहे. या तरुणीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल तालुका पोलीस ठाणे दूरध्वनी क्र 022-27452444 किंवा पोलीस हवालदार ए.बी.शिंदे यांच्याशी संपर्क साधावा.