| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील काकळघर, वावडुंगी, वेळास्ते, तेलवडे, कोर्लई या पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांची छाननी सोमवारी सकाळी 11 वाजता मुरुड तहसीलदार कार्यालयासमोरील दरबार हॉलमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रोहन शिंदे व निवडणूक नायब तहसीलदार अमित पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पाच निवडणूक अधिकारी यांनी केली. यावेळी पाच ग्रामपंचायतीचे सर्व उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुरुड तालुक्यातील वावडुंगी ग्रामपंचायत 7 सदस्यपदाकरीता 11 उमेदवारी अर्ज दाखल झाले तर सरपंचपदाकरीता 2 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले. वेळास्ते ग्रामपंचायत 7 सदस्य पदाकरीता करिता 18 उमेदवारी अर्ज तर 1 सरपंच पदाकरीता 5 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. ते सर्व अर्ज वैध ठरविण्यात आले.
तेलवडे ग्रामपंचायत 7 सदस्य पदाकरीता 12 उमेदवारी अर्ज तर सरपंच पदाकरीता 1 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. ते सर्व अर्ज वैध ठरविण्यात आले. काकळघर ग्रामपंचायत 9 सदस्य पदाकरीता 39 उमेदवारी अर्ज दाखल तर सरपंचपदाकरिता 8 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सर्व अर्ज वैध ठरविण्यात आले. कोर्लई ग्रामपंचायत 9 सदस्यपदाकरिता 37 उमेदवारी अर्ज तर सरपंच पदाकरीता 8 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. ते सर्व अर्ज वैध ठरविण्यात आले. या छाननीकरिता मुरुड पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस नाईक विक्रांत बांधणकर, पोलिस शिपाई प्रशांत लोहार व होमगार्ड तसेच समन्वयक प्रसाद माळी तहसीलदार कार्यालयातुन जयेश चोडणेकर यांच्याकडून दक्षता घेण्यात आली.