२६ किलो गांजा जप्त; नेरळ पोलिसांची भरीव कामगिरी

| नेरळ | प्रतिनिधी |
अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना नेरळ पोलिसांनी एका इर्टिका गाडीतून तस्करी करण्यात येत असलेला 26 किलो गांजा जप्त केला. एमएच 05 इएल 0464 ही मारुती ईर्टिका गाडी जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत काळे, धायगुडे, पोलीस कर्मचारी फरांदे, गिरी, पालवे चालक गर्जे यांच्या पथकाने केली.

गाडीमध्ये असलेल्या 13 बिस्किटांच्या बॉक्समधून गांजाची वाहतूक करण्यात येत होती. नेरळ पोलीस ठाण्यात गाडीचा चालक आणि अनोळखी व्यक्ती यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. फरार अनोळखी चालक याचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागला आहे. नेरळ पोलिसांनी हस्तगत केलेल्या गांजा आणि वाहन चालक यांची किंमत तीन लाख 18 हजार 520 रुपये इतका असून, अंमली पदार्थ गांजाची बाजारातील किंमत सव्वा लाख रुपये आहे. दरम्यान, नेरळ पोलिसांनी केलेल्या या कारवाईबद्दल त्यांचे कौतुक होत असून, सहायक पोलीस निरीक्षक शिंदे यांच्यासोबत गस्त पथकात पोलीस हवालदार हे पोलीस कर्मचारी होते. त्या सर्वाचे कौतुक जिल्हा पोलीस प्रमुख यांनी केले आहे.

Exit mobile version