| मुंबई | प्रतिनिधी |
लोकसभा निवडणूक 2024 च्या महाराष्ट्रातील पाचवा आणि शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडत आहे. मतदानाचा टक्का वाढवण्याचं सर्वांचं लक्ष आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील 13 मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 27.78 टक्के मतदान झाले आहे. 13 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
धुळे मतदार संघात 28.73 टक्के, दिंडोरी मतदार संघात 33.25 टक्के, नाशिक मतदार संघात 28.51 टक्के, पालघर मतदार संघात 31.06 टक्के, भिवंडी मतदार संघात 27.34 टक्के, कल्याण मतदार संघात 22.52 टक्के, ठाणे मतदार संघात 26.05 टक्के, मुंबई उत्तर मतदार संघात 26.78 टक्के, मुंबई उत्तर – पश्चिम – 28.41 टक्के, मुंबई उत्तर – पूर्व मतदार संघात 28.82 टक्के, मुंबई उत्तर – मध्य मतदार संघात 28.05 टक्के, मुंबई दक्षिण – मध्य मतदार संघात 27.21 टक्के, मुंबई दक्षिण मतदार संघात 24.46 टक्के मतदान झालेले आहे. कल्याण मतदार संघात सर्वात कमी मतदान तर दिंडोरी मतदार संघात जास्त मतदान झाले आहे.