रायगड जिल्ह्यात 29 रुग्ण; एकाचा मृत्यू

9 तालुक्यात नवीन रुग्ण नाही
33 कोरोनामुक्त, जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात बुधवार दि. 22 डिसेेंबर रोजी कोरोनाच्या 29 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 33 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तसेच 9 तालुक्यांमध्ये एकही रुग्ण नोंद झालेली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
बुधवारी पनवेल महापालिका हद्दीत 21, पनवेल ग्रामीण 1, उरण 1, खालापूर 1, अलिबाग 2, रोहा 2, महाड 1 असे 29 रुग्ण आढळले. तसेच कर्जत, पेण, मुरुड, माणगाव, तळा, सुधागड, श्रीवर्धन, म्हसळा, पोलादपूर या 9 तालुक्यांमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 72 हजार 493 झाली आहे. यापैकी 1 लाख 67 हजार 699 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 584 वर गेला आहे. सद्यस्थितीत 210 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version