रायगड जिल्ह्यात 295 नवे कोरोना रुग्ण

13 जणांचा मृत्यू तर 490 झाले कोरोनामुक्त
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात आज सोमवार दिनांक 19 जुलै रोजी नव्याने 295 रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 490 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

सोमवारी नव्याने जिल्ह्यात पनवेल मनपा 89, पनवेल ग्रामीण 38, उरण 5, खालापूर 19, कर्जत 10, पेण 27, अलिबाग 28,  मुरुड 2, तळा 2, माणगाव 14, रोहा 16, श्रीवर्धन 2, सुधागड 6, म्हसळा 6, महाड 28, पोलादपूर 3 असे एकूण 295 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर पनवेल मनपा क्षेत्रातील 1 उरणमधील 2, कर्जत तालुक्यातील 3, पेणमधील 3, मूरुड, तळा तालुक्यातील प्रत्येकी एक तर महाड तालुक्यातील दोन अशा 13 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर बरे झाल्याने कोरोनामुक्त झाल्याचे घोषीत करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये पनवेल मनपा 115, पनवेल ग्रामीण 56, उरण 14, खालापूर 24, कर्जत 19, पेण 23, अलिबाग 84, मुरुड 7, माणगाव 49, तळा 4, सुधागड 8, रोहा 34, श्रीवर्धन 15, म्हसळा 12, महाड 22, पोलादपूर 4 असे एकूण 490 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत रायगड जिल्ह्यात 1 लाख 56 हजार 684 संसर्गित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 1 लाख 48 हजार 363 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर उपचारादरम्यान 3 हजार 857 रुग्णांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत 4 हजार 464 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Exit mobile version