| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
मुरूड पोलीस स्टेशन हद्दीतील 48 गावांतून खासगी आणि सार्वजनिक मिळून एकूण 297 दहीहंड्या गोविंदांनी फोडल्या. यंदा 25 दहीहंड्या वाढल्याची माहिती पोलिसांनी दिली. गेल्या वर्षी 272 हंड्या उभारल्या होत्या. दहीहंड्या फोडण्यासाठी महिलांचा सहभाग देखील वाढता असल्याचे दिसून आले. मुरूड शहर आणि परिसरात गुरुवारी सकाळपासून पाऊस बरसायला सुरुवात झाल्याने आनंदाला आधिक उधाण आलेलं दिसून आले.
कोळीवाडा, भंडारवाडा, गणेश आळी, भोगेश्वर आळी, मारुती नाका, कुंभारवाडा, लक्ष्मीखार, दत्तवाडी मधली आळी भागात वाजत गाजत गोविंदा निघाल्याचे दिसत होते. दुपार नंतर एकदरा, राजपुरी,मजगाव, नांदगाव, काशीद,शिघ्रे,तेलवडे, खारआंबोली, आगरदांडा, उसडी, विहूर, वाणदे, जोसरांजन, सर्वे, उसरोली, आदाड, जमृतखार, टोकेखार,सावली,मिठागर, वावडूंगी,मुरूड शहर, भालगाव, खाजणी अशा गावांतून गोविंदांनी गोपाळकाला मुसळधार बरसू लागलेल्या पावसात चिंब चिंब भिजत आणि आनंद व्यक्त करीत उत्साहात साजरा केला.