साडेतीन शक्तिपीठ चित्ररथाला दुसरा क्रमांक

महाराष्ट्राच्या नारीशक्तीचा दिल्लीत गौरव
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली आयोजित करण्यात आलेल्या संचलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी होणार्‍या संचलनात महाराष्ट्र नारीशक्तीचा जागर या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी झाला. या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. या चित्ररथाचा देशात दूसरा क्रमांक आला आहे. तर उत्तराखंड राज्याच्या चित्ररथाचा पहिला क्रमांक आला आहे.

यावर्षी साडेतीन शक्तिपीठे तसेच स्त्री शक्तीचा जागर महाराष्ट्राच्या चित्ररथावर दिसून आले. त्याचबरोबर राज्यातील संस्कृती, पोतराज, वारकरी यांचाही प्रामुख्याने समावेश करण्यात आला होता. यामध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचे श्री क्षेत्र तुळजापूर, माहुरची रेणुकादेवी आणि वणीची श्री सप्तश्रुंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. त्यामुळे यंदा या नारीशक्तीचे दर्शन संबंध देशवासियांना घरबसल्या मिळाला.

Exit mobile version