। पुणे । प्रतिनिधी ।
पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी परिसरातील इंद्रायणी नगरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रसिद्ध पिझ्झा ब्रॅण्डच्या डॉमिनोज पिझ्झामध्ये चक्क चाकूचा तुटलेला तुकडा आढळून आला.
इंद्रायणी नगरमध्ये राहणाऱ्या अरुण कापसे यांनी शुक्रवारी रात्री आपल्या कुटुंबियांसाठी डॉमिनोज पिझ्झा स्टोअरमधून 596 रुपयांचा पिझ्झा ऑनलाइन ऑर्डर केला होता. पिझ्झा आल्यानंतर आपल्या कुटुंबीयांसोबत पिझ्झाचा आस्वाद घेत असताना अरुण कापसे यांच्या दातात काहीतरी धारदार घुसल्याचे जाणवले. त्यांनी पहिले असता चाकूचा तुटलेला तुकडा त्यांना आढळून आला. त्यानंतर त्यांनी लगेचच डॉमिनोज पिझ्झाच्या मॅनेजरला फोन केला आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. मॅनेजरने आधी याबाबत टाळाटाळ केली. मात्र, अरुण कापसे यांनी फोटो पाठवल्यानंतर मॅनेजरने कापसे यांच्या घरी घाव घेतली. पिझ्झातील तुटलेला चाकूचा तुकडा बघितल्यानंतर मॅनेजरलादेखील आश्चर्याचा धक्का बसला.