| मुंबई | प्रतिनिधी |
वांद्रे परिसरात आगीची मोठी घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या वांद्रे पूर्व परिसरात मोठी आग लागली आहे. वांद्रे पूर्वेकडील भारत नगर परिसरात मोठी आग लागली आहे. भारत नगर परिसरातील खाडी किनाऱ्यावरील तीवराचे जंगल आणि कचराकुंडीला मोठी आग लागली आहे. भारत नगर परिसरात धुराचे प्रचंड मोठे लोट निर्माण झाले आहे. यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. आग पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी या परिसरात झाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.