| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव येथील सहाय्यक शिक्षिका तन्मयी शिंदे यांच्या 50 व्या जन्मदिनाचे औचित्य साधून पार्वतीबाई महादेव सोनावणे यांच्या स्मरणार्थ तुषार शिंदे व तन्मयी शिंदे यांच्याकडून नांदगाव विद्यालयास वॉटर कुलर व फिल्टर भेट देण्यात आले. यावेळी सर्व शिक्षकांकडून तन्मयी शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
नांदगाव विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि थंड पाणी मिळावे या हेतूने वॉटर कुलर व फिल्टर दिले. यावेळी तुषार शिंदे, तन्मयी शिंदे, पांडुरंग दिघे, प्राचार्य बबन पालवे आणि शिक्षक वृंद उपस्थित होते.