स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
बनावट चलनी नोटा बनवणार्या तिघा जणांच्या टोळीला रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. अलिबाग-मांडवा बायपास रोड येथे एक काळया रंगाच्या सी.टी.100 मॉडेलच्या मोटार सायकलवरील दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी अशोक विठ्ठल पोकळे रा.विद्यानगर पो चेंढरे,अलिबाग यांचे जवळ येऊन 100 रूपये दराच्या 22 बनावट नोटा देत त्यांच्याकडून दोन कांद्यांच्या गोणी घेतल्या होत्या.या प्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अशोक पोकळे यांनी अलिबाग पोलिसात फिर्याद दाखल केली.
सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग यांच्या कडे सोपविण्यात आला.त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री.दयानंद गावडे यांनी तपास पथक तयार करून गुन्हा घडल्या ठीकाणाचे सीसीटीव्ही फुटेज पाहून तसेच फिर्यादीत नमूद वर्णनांच्या इसमांचा शोध घेतला तसेच गुप्त बातमीदारा मार्फत माहती मिळवून त्याद्वारे आरोपित यांना लागलीच जेरबंद करण्यात आलेले आहे.
सदर गुन्ह्यात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.य ामध्ये जयदीप अजित घासे,रा.मारुतीनाका ता.अलिबाग, सुमित सुनील बागकर रा.गोंधळपाडा, कौस्तुभ चंद्रकांत गीजम रा.राजमाला ता.अलिबाग यांना लागलीच अटक करून गुन्ह्याच्या तपासात आरोपींनी यांनी गुन्ह्यात बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे प्रिंटर, लॅपटॉप, शाई, कोरे कागद, एका बाजूस छापलेल्या 500 रुपये दाराच्या 63 नोटा किंमत 31,500/-रुपये , 200 रुपये दाराच्या 82 नोटा किंमत 16,400/-रुपये, 100 रुपये दाराच्या 22 नोटा किंमत 2200/-रुपये असे एकूण 49,900/- रुपयांच्या नोटा छापण्यात आलेल्या असून एकूण 27,500/-रुपये किमतीचा माल पोलिसांनी हस्तगत केलेला आहे. तसेच सदर आरोपित यांनी गुन्ह्याच्या तपासात गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. सदर गुन्ह्यातील तीनही आरोपींना 5 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आला आहे.