। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्य आयुक्त श्री.कांतीलाल उमाप यांच्या आदेशानुसार कोकण विभाग ठाणेचे विभागीय उपायुक्त सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक श्रीमती किर्ती शेडगे, ठाणे उपअधीक्षक श्री.चारुदत्त हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 25 सप्टेंबर 2021 रोजी रोहा तालुक्यातील कोपरी व कोपरी दापोली येथील खाडी किनारी व खाडीमधील बेटावर अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुरुड, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक अलिबाग, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अलिबाग यांचे दुय्यम निरीक्षक, सहाय्यक दुय्यम निरीक्षक व जवान स्टाफसह छोट्या बोटी मधून जावून केलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल 3 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या धाडीदरम्यान एकूण चार गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी (0 वारस) गुन्हे आहेत. तसेच नवसागर मिश्रित रसायन – 14000 लिटर हातभट्टी दारू, एकूण मुद्देमाल किंमत- रु.3 लाख 41 हजार हे सर्व नवसागर मिश्रीत रसायन जागीच नाश करण्यात आले आहे, अशी माहिती श्री.आनंद अं.पवार, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,मुरुड विभाग यांनी दिली आहे.