पत्रकार संघाच्या इमारतीचे नूतनीकरणासाठी 30 लाख

| गोवे-कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गालगत वरसगाव या ठिकाणी शासनाच्या जागेवर रोहा तालुका पत्रकार संघाची इमारत असून, त्या इमारतीचे नूतनीकरण करुन त्या ठिकाणी 30 लाख रुपये खर्च करुन तीन मजली इमारत बांधण्यात येईल, असे मत आ. अनिकेत तटकरे यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. आयोजित कार्यक्रमात वरसगाव नळ पाणी पुरवठा, पद्मावती नगर ते वरसगांव कालवा डांबरीकरण रस्ता आदी विकासकामांचे उद्घाटन पार पडले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार गांधी यांनी दिलेल्या निवेदनाच्या स्विकार करुन ताबडतोब वरसगाव पत्रकार भुवनाला 30 लाख मंजूर केले जातील. या पत्रकार भुवनात ग्रंथालय, वाचकांसाठी वर्तमान पत्र, गोरगरीब विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण मिळणे अशी योजना आहे. दुसर्‍या मजल्यावर वरसगाव ग्रामपंचायत कार्यालय, तिसर्‍या मजल्यावर परमपूज्य कलावती आई व बंधू यांच्यासाठी असून, त्या ठिकाणी माता भगिनीना भजन बोलण्याची सोय करण्यात येईल इमारतीसाठी लागणारा निधी खासदार सुनील तटकरे हे ही उपलब्ध करुन देतील, अशी ग्वाही आ. अनिकेत तटकरे यांनी यावेळी दिली.

Exit mobile version