क्रीडा क्षेत्रासाठी 300 कोटी

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
क्रीडा विभागासाठी बजेटमध्ये 300 कोटी रुपयांपर्यंत निधी वाढविण्यात आला आहे. 2021-2022 या वर्षासाठी क्रीडा अर्थसंकल्प 2757.02 कोटी रुपये होता, परंतु 2022-23 मध्ये क्रीडा अर्थसंकल्प 3062.60 कोटी रुपये झाला आहे. आशियाई क्रीडा आणि राष्ट्रकूल स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने क्रीडा अर्थसंकल्पात निधीची वाढ केली आहे. यावेळी अर्थसंकल्पात राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रमासाठी निधीची वाढ करण्यात आली आहे. मागील वर्षी 108 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते, तर यावेळी 138 कोटी रुपये देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे खेलो इंडिया कार्यक्रमाचे बजेटही वाढवण्यात आले आहे, मागील वर्षी ते 879 कोटी रुपये होते, ते यावेळी 974 कोटी रुपये करण्यात आले आहे.

Exit mobile version