| अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील 62 ग्रामपंचायतीचे आरक्षण मंगळवारी (दि. 22) जाहीर करण्यात आले. सोडत पध्दतीने हे आरक्षण सर्व राजकीय पुढारी, कार्यकर्ते तसेच शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. उसर येथील आदिश्री प्रशांत शिंदे या मुलीच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली. 62 पैकी 31 ग्रामपंचायतीवर महिला राज असणार आहे. उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत प्रक्रिया पार पडली.
31 ग्रामपंचायतींवर महिला राज

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606