| वाघ्रण | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील वाघ्रण ग्रामपंचायत निवडणूक सदस्य आरक्षण सोडत जाहीर होऊन ती प्रसिद्ध करण्यात आली आहे. मंडळ अधिकारी पोयनाड महेश निकम यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी पेढांबेचे तलाठी जारवाल निहालसिग, सरपंच डॉ. प्रेरणा म्हात्रे, सदस्य दिपक यशवंत पाटील, हरिश्चंद्र पाटील, मीना म्हात्रे, गीता पाटील, मनिषा पाटील, ग्रामस्थ दयानंद म्हात्रे, गिरीश पाटील, पद्माकर पाटील, विवेक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामसेविका सुवर्णा पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
17 जुलै रोजी मुदत संपत असलेल्या या ग्रामपंचायतीची सोडत जाहीर करण्यात आली. त्यानुसार प्रभाग क्रमांक 1 मध्ये एकूण 3 सदस्य असून, 2 सर्वसाधारण स्त्रीया व 1 सर्वसाधारण सदस्य अशी रचना, तर प्रभाग क्रमांक 2 मध्ये 1 सर्वसाधारण स्त्री व 1 नामप्र सदस्य त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 3 मध्ये 1 सर्वसाधारण स्त्री व 1 सर्वसाधारण सदस्य अशी सोडत जाहीर केली. एकूण 7 सदस्य सोडत जाहीर करताना याआधी सरपंचपदासाठी आरक्षण खुले असल्याचे जाहीर करण्यात आले.