जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रविवारी रायगड जिल्ह्यातील 7 तालुक्यामध्ये 33 रुग्णांची नोंद झाली असून सद्यस्थितीत जिल्ह्यात 262 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे. दिवसभरात 24 रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
रविवारी जिल्ह्यातील पनवेल मनपा क्षेत्रात 18, पनवेल ग्रामीण 4, उरण 2, कर्जत 3, मुरुड 2, रोहा 1, सुधागड 1, आणि पोलादपूर 2 असे 33 रुग्ण आढळले. तसेच पनवेल मनपा क्षेत्रातील 5, पनवेल ग्रामीण 4, उरण 3, खालापूर 6, कर्जत 1, माणगाव 5 अशा एकूण 24 रुग्णांना बरे वाटल्याने कोरोना मुक्त घोषित करण्यात आले आहे.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 22 हजार 669 झाली आहे. यापैकी 2 लाख 17 हजार 701 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 706 झाला आहे. सद्यस्थितीत 262 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात 33 कोरोना रूग्ण; 24 कोरोना मुक्त
