मावळमध्ये उरले 33 जण; तीन मशिन लागणार


| रसायनी | वार्ताहर |

लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात (दि.13) मे रोजी मतदान होत आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (दि.29) मावळमध्ये 35 पैकी फक्त दोन उमेदवारांनी माघार घेतली आहे. माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, 33 उमेदवार शर्यतीत असले, तरी खरी लढत ही तिरंगीच असणार आहे. दरम्यान, 33 उमेदवारांसाठी आता इव्हीएमच्या तीन मशिन मतदानाकरिता मावळमध्ये लागणार आहेत. मावळमध्ये 33 उमेदवारांमध्ये तब्बल 18 अपक्ष असून, तीन मुख्य व मोठ्या पक्षाचे, तर उर्वरित छोट्या पक्षांचे उमेदवार आहेत. त्यामुळे खरी लढत आघाडीचे संजोग वाघेरे-पाटील, महायुतीचे श्रीरंग बारणे आणि वंचितचे माधवी जोशी अशी तिरंगी होणार आहे. या रिंगणात दोन वाघेरे आणि दोन संजोग आहेत. त्यातील संजय वाघेरे नाशिक यांचा अर्ज छाननीत बाद झाला आहे. पण, शिंदे गटाने उभे केलेले उरणचे दुसरे संजोग पाटील यांनी अर्ज मागे न घेतल्याने आता दोन संजोग शर्यतीत राहिले आहेत.

Exit mobile version