44 कोरोनामुक्त, 9 तालुक्यात नवीन रुग्ण नाही
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात मंगळवार दि. 16 नोव्हेंबर रोजी कोरोनाच्या 34 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायक म्हणजे उपचारादरम्यान आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर दिवसभरात तब्बल 44 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तसेच 9 तालुक्यांमध्ये एकही रुग्ण नोंद झालेली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
मंगळवारी पनवेल महापालिका हद्दीत 24, अलिबाग 2, पनवेल ग्रामीण 3, पेण 2, मुरुड, महाड, माणगाव या तीन तालुक्यात प्रत्येकी एक असे एकूण 34 रुग्ण आढळले. तसेच उरण, खालापूर, कर्जत, पोलादपूर, रोहा, तळा, सुधागड, म्हसळा, श्रीवर्धन या 9 तालुक्यांमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 71 हजार 684 झाली आहे. यापैकी 1 लाख 66 हजार 888 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 563 वर गेला आहे. सद्यस्थितीत 233 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.