। माणगाव । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील २४० पैकी १९१ सार्वत्रिक ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू झाले आहे. २४० सरपंचपदासाठी ५३१ उमेदवार तर १ हजार ९४० सदस्यपदासाठी ३ हजार २३८ उमेदवार भवितव्य आजमावत आहेत.
माणगाव तालुक्यातील १९ ग्रामपंचायंतीच्या निवडणूकांपैकी ३ ग्रामपंचायतींच्या निवडणूका बिनविरोध झाले असून उरवरीत १६ ग्रामपंचायतींंच्या निवडणूकीसाठी सकाळी ११:३० वाजेपर्यंत ३४% इतके मतदान झाले आहे.