। पेण । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील २४० पैकी १९१ सार्वत्रिक ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू झाले आहे. 240 सरपंचपदासाठी 531 उमेदवार तर 1 हजार 940 सदस्यपदासाठी 3 हजार 238 उमेदवार भवितव्य आजमावत आहेत.
मतदानाच्या अहवालानुसार पेणमध्ये पहिल्या टप्प्यात २४. ८१ टक्के मतदान झाले असून मतदान केंद्रांवर कडक बंदोबस्तात सुरु आहे. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदारांनी सकाळ पासूनच मतदान केंद्रा बाहेर रांगा लावल्या आहेत.