। पनवेल। प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील२४० पैकी १९१ सार्वत्रिक ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू झाले आहे. तहसीलदार विजय तळेकर यांनी दिलेल्या माहिती नुसार पनवेलमध्ये सकाळी साडे नऊ पर्यत १८ टक्के मतदान झाले असून, मतदानची ही टक्केवारी पाहता सायंकाळी साडे पाच पर्यत ऐंशी ते ९० टक्के मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील असे मत राजकीय जानकरांनी व्यक्त केले आहे. तालुक्यातील १० ग्रामपंचायती साठी रविवारी सकाळी ८ पासून सुरवात झाली आहे. कडक बंदोबस्तात सुरु असलेल्या या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदारांनी सकाळ पासूनच मतदान केंद्रा बाहेर रांगा लावल्या आहेत.मतदान सुरु असलेल्या दहा ग्रामपंचायतीमध्ये शिवकर,नीतलस,भातान,कांनपोली,दिघाटी,करंजाडे,शिरढोण,,चिंध्रन,केळवणे, नेरे आदी ग्रामपंचायतीचा समावेश असून, थेट सरपंच पदासाठी होत असलेल्या या निवडणूक सर्वत्र शांततेचा वातावरणात होत असल्याची माहिती देण्यात आली आहे.