। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील 240 पैकी 191 सार्वत्रिक ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू झाले आहे. सकाळी 9.30 वाजेपर्यंत 15.08 टक्के मतदान झाले आहे. 240 सरपंचपदासाठी 531 उमेदवार तर 1 हजार 940 सदस्यपदासाठी 3 हजार 238 उमेदवार भवितव्य आजमावत आहेत. 618 मतदान केंद्रांवर 2 लाख 97 हजार 370 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी निवडणूक प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. मतदान केंद्रावर प्रशासनाचे 3 हजार 708 कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत.