| मुंबई | प्रतिनिधी |
घाटकोपरमध्ये पारेख रुग्णालया शेजारी असलेल्या एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली.यामध्ये एक जण दगावल्याचे वृत्त आहेत. शनिवारी दुपारी पारेख रुग्णालया शेजारी असलेल्या एका इमारतीला भीषण आग लागली. आग लागल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पारेख रुग्णालयात दाखल असलेल्या 22 रुग्णांना दुसर्या रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले आहे. या आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.त्यांनी अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.