77 कोरोनामुक्त, 10 तालुक्यात नवीन रुग्ण नाही
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात मंगळवार दि. 9 नोव्हेंबर रोजी कोरोनाच्या 35 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. उपचारादरम्यान 2 रुग्णांचा मृत्यू झाला. तर दिवसभरात 77 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तसेच 10 तालुक्यांमध्ये एकही रुग्ण नोंद झालेली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
मंगळवारी पनवेल महापालिका हद्दीत 27, अलिबाग 2, उरण 1, पनवेल ग्रामीण 2, पेण 2, खालापूर 1 असे 35 रुग्ण आढळले. तसेच कर्जत, श्रीवर्धन, रोहा, , माणगाव, मुरुड , तळा, सुधागड, म्हसळा, महाड, पोलादपूर या 10 तालुक्यांमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 71 हजार 494 झाली आहे. यापैकी 1 लाख 66 हजार 622 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 402 वर गेला आहे. सद्यस्थितीत 470 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.