तोडणकर गुरुजी यांचे गौरवोद्गार
कित्ते भंडारी हितवर्धक मंडळ अलिबाग रायगड यांच्या वतीने हृदय सत्कार
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
कोरोना काळात रुग्ण तसेच निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी केलेल्या कार्याला तोड नाही. त्यांच्या या कार्याची नोंद महाराष्ट्र सरकारने नोंद घेऊन त्यांचा उचित गौरव करण्याची आवश्यकता होती. मात्र महाराष्ट्र बाहेरील संस्थेने ही दखल घेत त्यांना पुरस्कृत तसेच डॉक्टरेट ने सन्मानित केले. त्यामुळे आता तरी महाराष्ट्राने प्रशांत नाईक यांच्या कार्याची नोंद घ्यावी असे गौरवोद्गार भंडारी समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तोडणकर गुरुजी यांनी काढले.
अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी नेल्सन मंडेला नोबेल पीस वार्डने – 2021 व मानद डॅाक्टरेट देऊन सन्मानित करण्यात आले त्याबद्दल कित्ते भंडारी हितवर्धक मंडळ अलिबाग रायगड यांच्या वतीने हृदय सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी
तोडणकर गुरुजी यांच्यासह अध्यक्ष बळवंत शिरसेकर, ज्येष्ठ वास्तू विशारद शशिकांत मोहिते, समन्वयक संतोष मोरे, मधुकर परकर तुकाराम शिलधनकर, प्रसाद नागवेकर, दत्तदास मयेकर, विनायक मोरे, सचिन मोरे, गणेश मोरे, तेजस तोडणकर, राजेंद्र बांदिवडेकर आदी उपस्थित होते. तोडणकर गुरुजी पुढे म्हणाले की, प्रशांत नाईक यांच्या नगराध्यक म्हणून बहुमोल कार्याला तोड नाही, अलिबाग शहरातील नागरिकांच्या दैनंदिन आवश्यक सुविधा पाणीपुरवठा, रस्ते तसेच आरोग्य याबाबतीतले त्यांचे कार्य न विसरण्या सारखे आहे.