भीषण अपघात! दरीत बस कोसळून 36 जणांचा मृत्यू

। उत्तराखंड । वृत्तसंस्था ।

उत्तराखंडमध्ये बस दीडशे फूट खोल दरीत कोसळली. बसमध्ये जवळपास 42 प्रवासी असून या भीषण अपघातात 36 जणांचा मृत्यू झाला. तर 6 जण जखमी झाले आहेत.

उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यात बसचा भीषण अपघात झाला. सोमवारी (दि. 04) सकाळी 8 च्या सुमारास रामनगर परिसरात प्रवासी बस दीडशे फूट खोल दरीत कोसळली. या बसमध्ये जवळपास 42 प्रवासी असून ही बस किनाथहून रामनगरकडे जात होती. या अपघातात 28 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 8 जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. तर, तर 6 जण जखमी झाले आहेत.

Exit mobile version