३६व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र-हिमाचल प्रदेश अंतिम लढत

। मुंबई । वार्ताहर ।
महाराष्ट्राने उपांत्य फेरीच्या सामन्यात तामिळनाडूला 45-25 असे पराभूत करीत 36व्या राष्ट्रीय खेळ स्पर्धेतील कबड्डीत अंतिम फेरीत धडक दिली. कंकरिया,अहमदाबाद, गुजरात येथील क्रीडा संकुलातील या सामन्यात महाराष्ट्राने आक्रमक सुरुवात करीत पूर्वार्धात दोन लोण देत 27-08 अशी भक्कम आघाडी घेतली होती. उत्तरार्धात शेवटी आणखी एक लोण देत ही आघाडी वाढवीत नेत 20 गुणांनी विजय साजरा केला. सोनाली शिंगटे, स्नेहल शिंदे, पूजा यादव यांच्या संयमी चढाया, त्याला रेखा सावंत, अंकिता जगताप यांची मिळालेली पकडीची साथ यामुळे हे शक्य झाले. महाराष्ट्राची अंतिम लढत हिमाचल प्रदेश संघाशी होईल. हिमाचलने दुसर्‍या उपांत्य हरियाणाचा अत्यंत चुरशीच्या लढतीत 28-27असा पराभव करीत ही किमया साधली.

Exit mobile version