रायगड जिल्ह्यात 37 रुग्ण; चौघांचा मृत्यू

65 कोरोनामुक्त, 10 तालुक्यात नवीन रुग्ण नाही
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात सोमवार 25 ऑक्टोबर रोजी कोरोनाच्या 37 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 4 रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दिवसभरात 65 रुग्ण कोरोनामुक्त झाले. सोमवारी पनवेल महापालिका हद्दीत 25, खालापूर 2, अलिबाग 3 तर पनवेल ग्रामीण 4, कर्जत 2, मुरुड 1 असे 37 रुग्ण आढळले. तसेच उरण, पेण, माणगाव, रोहा, सुधागड, महाड, म्हसळा, श्रीवर्धन, पोलादपूर, तळा या 10 तालुक्यांमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 70 हजार 532 झाली आहे. यापैकी 1 लाख 65 हजार 414 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 384 वर गेला आहे. सद्यस्थितीत 734 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version