77 कोरोनामुक्त, 11 तालुक्यात नवीन रुग्ण नाही
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात मंगळवार दि. 26 ऑक्टोबर रोजी कोरोनाच्या 37 नव्या रुग्णांची नोंद झाली असून दिलासा दायक म्हणजे आज उपचारादरम्यान एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. दिवसभरात 77 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर 11 तालुक्यांमध्ये एकही रुग्ण नोंद झालेली नसल्यची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
मंगळवारी पनवेल महापालिका हद्दीत 17, खालापूर 2, अलिबाग 10 तर पनवेल ग्रामीण 4, कर्जत 4 असे 37 रुग्ण आढळले. तसेच उरण, पेण, मुरुड, माणगाव, तळा, रोहा, सुधागड, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर या 11 तालुक्यांमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 70 हजार 974 झाली आहे. यापैकी 1 लाख 65 हजार 927 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 384 वर गेला आहे. सद्यस्थितीत 662 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.