तळा | वार्ताहर |
तळा प्रतिनिधी तळा नगरपंचायतीत 17 जागांसाठी निवडणूक होत असून, 77 अर्ज दाखल झाले होते. आज छाननी करण्यात आली असून, 19 बाद झाले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, शेकाप, वंचित आघाडी व अपक्ष उमेदवार उभे राहिले आहेत. यावेळी हौशे नवशे गवशे आपले नशीब अजमवणार असून, रिगंणात उभे राहिले आहेत. तर काही जण प्रेस्टीससाठी दुसर्या वॉर्डातून आयात करावे लागले आहेत. त्यामुळे नवखे उमेदवाराला निवडणूक आणण्यासाठी आपली ताकद पणाला लावावी लागणार आहे.
निवडणुकीसाठी आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज करण्यात आली अधिकार्यांनी एकूण 58 अर्जांची छाननी केली. त्यातून 19 अर्ज अवैध ठरले आहेत. अर्ज मागे घेण्यासाठी 13 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असल्याने कोण कोणासोबत समझोता करणार यावर उमेदवाराचा निकाल अवलंबून राहील. मतदान 21 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत असेल. 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल.
तळा : 77 पैकी 39 अर्ज वैध
