दिघीतील ४०० नौका परतीच्या मार्गावर

| दिघी | वार्ताहर |
वादळामुळे आसर्‍यास आलेल्या 400 मच्छिमार बोटी आता दिघी बंदरातून परतीच्या मार्गावर लागल्या आहेत. गणेशोत्सवानंतर कोळी बांधवांची मासेमारीसाठी काही दिवसाची सुरुवात झाली असतानाच पुन्हा आठवडाभर ढगाळ वातावरणात पाऊस पडत आहे. या आठ दिवसाच्या कालावधीत रायगड, रत्नागिरी, ठाणे जिल्ह्यातील शेकडो मासेमारी नौका समुद्रात होत्या. दोन दिवसांपासून वादळी वार्‍याने थैमान घातल्याने यामधील 400 अधिक नौकांनी सुरक्षित समजल्या जाणार्‍या दिघीबंदर किनार्‍यावर आश्रय घेतला होता. या बोटी करंजा, मोरा, अलिबाग आदी गावांतील असून काही रत्नागिरी, ठाणे जिल्ह्यासह परप्रांतातील गुजरात मधील दमन येथील असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाकडून सांगण्यात आले. या नौकांतील 3500 हुन अधिक खलाशी वादळ थांबण्याची वाट पहात आठवडाभर दिघी बंदरात मुक्कामास होते. अखेर तारीख 18 रोजी सर्व नौका वादळातून सुटका झाल्याने परतीच्या मार्गावर निघाले.

बदलत्या हवामानामुळे समुद्रातील माशांचे प्रमाण कमी झाले असून त्यामुळे मच्छीमारी व्यवसायावर विपरीत परिणाम झाला असल्याची भावना याप्रसंगी मच्छीमारांनि व्यक्त केली व्यवसायाच्या प्रतीक्षेत असणार्‍या मासेमारांना सध्या मोठे मासे मिळण्याच्या कालावधीत वादळाचे संकटाला सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीत आर्थिक नुकसान होत असल्याने शासनाकडून मदतीची गरज आम्हा कोळी बांधवांना आहे.

Exit mobile version