40 वी कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

महाराष्ट्राचे मुले व मुली उपांत्य फेरीत
मुंबई | प्रतिनिधी |
भुवनेश्‍वर येथील बिजू पटनाईक इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद 40व्या कुमार मुली खो खो स्पर्धेत शनिवारी महाराष्ट्रच्या मुले व मुलींनी तसेच कोल्हापूरच्या व मुलींनी उपांत्य फेरी गाठली.
शनिवारी सकाळी महाराष्ट्राच्या मुलींनी तमिळनाडूचा 10-8 असा डावानी पराभव केला. सरिता दिव्या, अश्‍विनी शिंदे व जान्हवी पेठे व अंकिता लोहार यांनी शानदार खेळी केली. तमिळनाडूकडून के. श्रीनिथी हिने एकाकी लढत दिली.
मुलांनी छत्तीसगडवर 10-8 अशी डावानी मात केली. यात किरण वासावेने 4.40 व 1.40 मिनिटे संरक्षण अशी खेळी केली. सौरभ अहिर व सूरज जोहरे यांनी 2.30 मिनिटे संरक्षण करीत त्याला साथ दिली. सूरजने 2 गडीही बाद केले.
कोल्हापूरला राष्ट्रीय स्पर्धेत थेट प्रवेश असतो. त्यांच्या मुलींनी पंजाबचा 8-7 असा 5.40 मिनिटे राखून विजय मिळविला. सृष्टी शिंदे (3.40व 2.10 मिनिटे संरक्षण) व सौंदर्या सुतार (4 गुण) यांनी संघाच्या विजयात उल्लेखनीय कामगिरी केली.
अन्य निकाल :
मुली : ओडिशा विजयी वि. पश्‍चिम बंगाल 13-5 एक डावाने,
कर्नाटक विजयी वि. राजस्थान 10-8.
मुले : ओडिशा विजयी वि. तेलंगणा 19-8.
दिल्ली विजयी वि. आंध्र 10-9.

असे होणार उपांत्य सामने :
मुली : महाराष्ट्र-ओडिशा, कोल्हापूर-कर्नाटक.
मुले : महाराष्ट्र-ओडिशा, पश्‍चिम बंगाल-दिल्ली

Exit mobile version