रायगड जिल्ह्यात 47 रुग्ण; चार रुग्णांचा मृत्यू तर 232 कोरोनामुक्त, 9 तालुक्यात नवीन रुग्ण नाही

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात आज मंगळवारी 19 ऑक्टोबर रोजी कोरोनाच्या 47 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 4 रुग्ण दगावले आहेत. तर दिवसभरात 232 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
 
आज पनवेल महापालिका हद्दीत 29, पनवेल ग्रामीणमध्ये 9, कर्जतमध्ये 1, पेणमध्ये 5, महाडमध्ये 1, रोह्यात 1, माणगावमध्ये 1 रुग्णाची नोंद झाली आहे. तर खालापूर, उरण, अलिबाग, म्हसळा, मुरुड, श्रीवर्धन, पोलादपूर, सुधागड, तळा या तालुक्यांमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.
 
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 70 हजार 262 झाली आहे. यापैकी 1 लाख 64 हजार 976 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 376 वर गेला आहे. सद्यस्थितीत 910 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.”

Exit mobile version