| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध मोठे आणि कठोर निर्णय घेतला आहे. सार्क व्हिसा सूट धोरणांतर्गत पाकिस्तानी नागरिकांना दिली जाणारी सुविधा बंद करण्यात आली आहे. या निर्णयानुसार आता पाकिस्तानी नागरिक या सवलती अंतर्गत भारतात प्रवास करू शकणार नाहीत. या सुविधेअंतर्गत भारतात आधीच उपस्थित असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना एका आठवड्याच्या आत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पहलगाममधील हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध तणावपूर्ण आहेत. भारत सरकारचा हा निर्णय राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा आणि धोरणात्मक पाऊल मानला जात असल्याची प्रतिक्रिया पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर 6 वर्षांनी पृथ्वीवरील स्वर्ग मानले जाणारे काश्मीर निष्पापांच्या रक्ताने माखले. पहलगामच्या ममिनी स्वित्झर्लंडफ बैसरन येथील दहशतवादी हल्ल्याने पुलवामाच्या जखमा ताज्या केल्या. ज्यामध्ये 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. हिरवळीसाठी प्रसिद्ध असलेल्या बैसरन खोऱ्यातील हिरवीगार शेते मंगळवारी दुपारी रक्ताने लाल झाली. सर्वत्र निष्पाप लोकांचे मृतदेह पडले होते आणि रडणारे कुटुंबीय तिथेच होते. या भयानक दृश्याने 14 एप्रिल 2019 रोजी पुलवामा हल्ल्याच्या जखमा ताज्या झाल्या. जिथे दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला होता. पहलगाममध्येही दहशतवाद्यांनी असेच काहीसे केले. जिथे त्यांनी प्रथम लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारले आणि नंतर अंदाधुंद गोळ्या झाडल्या. ज्यामध्ये 28 लोक ठार झाले. दहशतवाद्यांच्या या भ्याड आणि अमानवी कृत्याने पर्यटकांनी नेहमीच गजबजलेल्या बैसरन खोऱ्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत काश्मीरमध्ये पर्यटकांवर इतका मोठा हल्ला झाला नव्हता. गेल्यावर्षी 18 मे च्या रात्री दहशतवाद्यांनी 2 ठिकाणी हल्ला केला होता. यामध्ये एक हल्ला पहलगामजवळ आणि दुसरा खुल्या पर्यटक छावणीत झाला होता.
पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी पाच मोठे निर्णय
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारने कठोर पाऊल उचलत पाच मोठे निर्णय घेतले आहेत. या निर्णयानुसार पाकिस्तानी नागरिकांना पुढील 48 तासांत भारत सोडावा लागणार आहे. याचबरोबर कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारतात प्रवेश मिळणार नाही. त्याचबरोबर केंद्र सरकारने 1960 चा सिंधू पाणी करारही स्थगित करण्यात आला आहे. पाकिस्तान सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाला पाठिंबा देणे बंद करणार नाही तोपर्यंत या करारावरील स्थगिती कामय राहणार आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. पंतप्रधान यांच्या अधिकृत निवासस्थानी झालेल्या सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीनंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, या दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य ओळखून, सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने खालील निर्णय घेतले आहेत.
महत्वाचे निर्णय 1960 चा सिंधू पाणी करार तात्काळ स्थगित, जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत राहील तोपर्यंत हा करार स्थगित राहील. संयुक्त चेकपोस्ट अटारी तात्काळ बंद ज्यांनी वैध मार्गाने अटारी सीमा ओलांडली आहे, ते 1 मे 2025 पूर्वी त्या मार्गाने परत येऊ शकतात. पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सवलत योजनेअंतर्गत भारतात प्रवास करण्याची परवानगी रद्द एसव्हीईएस व्हिसाद्वारे सध्या भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ भारत सोडण्यासाठी 48 तासांची मुदत नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण, लष्करी, नौदल आणि हवाई अधिकाऱ्यांनी एका आठवड्यात भारत सोडावा भारताने इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयात्ूान स्वतःचे संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागारांना माघारी बोलवण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानवर कठोर कारावाईचा निर्णय
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. मंगळवारी पर्यटकांना लक्ष्य करून झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री या मुद्द्यावर अधिकाऱ्यांसोबत सतत बैठका घेत आहेत. पंतप्रधान मोदींनी बुधवारी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीचीची सुमारे 2 तास बैठक घेतली आणि पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.