| संभाजीनगर | प्रतिनिधी |
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोर निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकरला तक्रारदाराकडे मागणी केलेल्या 18 पैकी 5 लाख रुपये घेताना रंगेहाथ ताब्यात घेतले. त्यानंतर याच्या घराची झाडाझडती घेतली असता मोठं घबाड पोलिसांना सापडलं आहे. खरोळकरच्या घरातून तब्बल 13 लाख 06 हजार 380 रुपयांची रोकड, 589 ग्रॅम म्हणजेच 59 तोळे सोन्याचे दागिने, ज्याची किंमत अंदाजे 50 लाख 99 हजार 583 रुपये आहे. तसेच, 3 किलो 553 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने ज्याची किंमत 3 लाख 39 हजार 345 रुपये एवढी आहे. मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम अशी एकूण 67 लाख 45 हजार 308 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.