5 लाख हवेत, तेही विना गॅरंटी? नेमकी काय आहे योजना…जाणून घ्या!

कोरोना आता आटोक्यात आला असून सध्या लग्नसराई सुरु झाली आहे, तसेच कॉरोनकाळात अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले, खूपजणांचा तोटा झाला पण आता सर्वानाच काळजी करण्याचे कारण नाही कारण फक्त पाच स्टेप्समध्ये मिळणार आहे पाच लाखांचे लोन.

अडीअडचणीला पैसे कुठून उभे करायचे असा प्रश्‍न अनेकांना पडतोच. तेव्हा नेमकं पैसे कुणाकडे मागू? कोण देईल? कुणासमोर हातपाय पसरु? अशी अवस्था होऊन जाते. पण आता कर्जासाठीची एक नवी योजना पेटीएम घेऊन आले असून या योजनेची फारच चर्चा रंगली आहे. पाच लाख रुपयांपर्यंत विना गॅरेंटी लोन पेटीएम देतंय. नेमकी ही योजना काय आहे, असा प्रश्‍न अनेकांना पडलाय. याच योजनेबद्दलची सगळी माहिती आता जाणून घेणार आहोत. अत्यंत कमी व्याजदरात पेटीएमनं विना हमी लोन देण्याची योजना समोर आणली आहे. अनेकांनी या योजनेचा लाभही घेतला असून ही योजना नेमकं काम कशी करते? ते समजून घेणार आहोत. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे या कर्ज घेण्याच्या योजनेत दरदिवशी थोड्या-थोड्या प्रमाणात ईएमआय भरण्याचीही सुविधा देण्यात आली आहे.
छोटा-मोठा व्यापार करणार्‍यासाठी पेटीएमनं गूडन्यूज दिली आहे. डिजीटल पेमेंट सर्विस ऍप असलेल्या पेटीएमनं छोट्या व्यावसायिकांना पाच लाखांचं कर्ज देण्याची योजना आणली आहे. या योजनेसाठी एनबीएफसीसोबत पेटीएमनं करार केलाय. या कर्जाच्या योजनेला कोलॅटरल फ्री इन्टंट लोन असंही म्हणतात. पेटीएम ऍपच्या माध्यमातून मर्चंट लिडिंग प्रोग्रामच्या माध्यमातून हे कर्ज देण्यात येईल.

हे लोन घेतलेल्यांना परतफेड वेळेच्या आधी करण्याचीही मुभा देण्यात आली आहे. तसंच पाच लाख रुपयांचं हे लोन मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अतिरीक्त कागदपत्रांची गरज लागणार नाही. लोन प्रीपेमेंटवर कोणताची चार्ज घेतला जात नाही.

अशी आहे प्रक्रिया

व्यापार्‍यांनी घेतला लाभ
सरासरी काळाप्रमाणे कर्जाची रक्कम वाढवता येऊ शकते, असाही एक दावा केला जातो. 12 ते 14 महिन्याच्या टेन्युअरसोबत 1,20,000 पासून 1,40,000 पर्यंत लोन मिळू शकतं, असे लाईव्ह मिंटच्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. आतापर्यंत 25 टक्के व्यापार्‍यांनी एकापेक्षा जास्त वेळा अशाप्रकरे पेटीएममधून कर्ज घेतले आहे.

(टीप पाच लाख लोनची योजना PAYTM शी संबंधित असून या योजनेसंदर्भात बातमीत फक्त माहिती दिली आहे. लोन संदर्भात बातमीत PAYTM लोनसाठी स्टेप्स दिल्या आहेत त्या फॉलो कराव्यात.)

Exit mobile version