अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या नावाने 50 लाखांची फसवणूक

| मुंबई | वृत्तसंस्था |

ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार वाढत आहेत. त्यातच आता अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्या नावाने एका चाहतीची 50 लाखांची फसवणूक झाली आहे.

अभिनेत्याच्या फॅन पेजवरुन सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्याबद्दल खोट्या बातम्या पसरवल्या होत्या, त्या बातम्या खऱ्या मानून अमेरिकेतील मीनू वासुदेव हिची 50 लाख रुपयांची मोठी फसवणूक झाली.

मीनू वासुदेवचा दावा आहे की, अलिजा आणि हुस्ना परवीन नावाच्या दोन मुलींनी सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्याबद्दल खोट्या बातम्या तयार करून आपली फसवणूक केली. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या जीवाला धोका असल्याची खोटी बातमी त्यांनी तयार केली. त्यात तिला असं सांगण्यात आले कि, कियारामुळे तिचा पती सिद्धार्थ धोक्यात आहे. मीनू वासुदेवच्या म्हणण्यानुसार, त्या दोन ॲडमिन मुलींनी, कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केली होती आणि सिद्धार्थचे आता कोणतेच बँक खातेही नाही असा सांगितलेले जे तिला खरे वाटले. त्यानंतर अलिजा नावाच्या मुलीने अभिनेत्याची फॅन मीनूला सिद्धार्थला वाचवण्यासाठी मदत करण्याची विनंती केली.

त्यानंतर अलिजाने मीनू वासुदेवला कियाराच्या टीममधील राधिका नावाच्या खबरीशी मीनूची ओळख करून दिली. मीनूने सांगितले की, ती दर आठवड्याला सिद्धार्थ आणि कियाराबद्दलची सर्व आतील माहिती जाणून घेण्यासाठी आणि सिद्धार्थशी बोलण्यासाठी पैसे देत होती. मीनू वासुदेवने या संभाषणाचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. मीनूच्या म्हणण्यानुसार, सिद्धार्थ मल्होत्राचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात तिला 50 लाख रुपयांचे नुकसान झाले.

Exit mobile version