कळंबोली येथून इसम बेपत्ता

| पनवेल | प्रतिनिधी |

आराम करण्यासाठी रोडपली येथील कॅपेसिटी बिल्डिंगच्या काम चालू असलेल्या पत्र्याच्या रूममध्ये जातो असे सांगून एक इसम कळंबोली येथून गेला. तो अद्याप सदर ठिकाणी न पोहोचल्याने तो हरवल्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

राजकुमार अनुकुल मंडल (वय 52 रा.रोडपली) अंगाने मध्यम, रंग गोरा, उंची अंदाजे 5. फुट, चेहरा सरळ, नाक सरळ, डोक्याचे केस काळे पांढरे, अंगात नेसुणीस फुलबाह्यांचे काळ्या रंगाचे शर्ट, पॅन्ट काळ्या रंगाची, पायात काळ्या रंगाची चप्पल, तसेच बंगाली, हिंदी भाषा येते. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी कळंबोली पोलीस ठाणे किंवा मपोहवा सविता पाटील मो नं: 9834440638 येथे संपर्क साधावा.

Exit mobile version