अबब! सुधागडमध्ये 53 रुपये पेट्रोल

स्वस्त पेट्रोलसाठी लांबच लांब रांग
। पाली/बेणसे ।,प्रतिनिधी ।
सुधागड मनसेतर्फे राज ठाकरे यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (ता.14) 53 रुपये प्रती लिटर दराने पेट्रोलचे वाटप करण्यात आले. तब्बल निम्म्या किंमतीने पेट्रोल मिळत असल्याने नानोसे येथील एस्सार पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.

सुधागड तालुका अध्यक्ष सुनिल साठे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. सध्या पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहेत. दर प्रति लिटर 103 रुपये झाले आहेत. त्यात कोरोनामूळे अनेकांच्या नोकर्‍या गेल्यात, हाताला काम नाही. त्यामुळे आर्थिकदृष्टया कंबरडे मोडले आहे. रायगड जिल्हा मनसे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाला मनसे तालुका अध्यक्ष सुनिल साठे, विभाग अध्यक्ष केवल चव्हाण, परेश वनगळे, श्री ठकोरे, अनिकेत पाठारे, मयूर तेलंगे, व अल्पेश दळवी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version