वाढीव नळपाणी पुरवठा योजनेसाठी 60 लाखांचा निधी

। खांब-रोहे । वार्ताहर ।
रोहे तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी गावातील नागरिकांच्या वाढीव नळपाणी पुरवठा योजनेसाठी आ.अनिकेत तटकरे यांच्याकडून 59 लाख 73 हजार750 रू.एवढ्या निधीचे प्रशासकीय मान्यतेचे पत्र ग्रामस्थांना देण्यात आले आहे.

यावेळी माजी सरपंच वसंत मरवडे,राम मरवडे,गोवे माजी सरपंच नरेंद्र जाधव,माजी उपसरपंच गजानन बामणे, रविंद्र मरवडे,नामदेव मरवडे आदींसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.तर कोकणचे भाग्यविधाते तथा रायगडचे खा.सुनील तटकरे,आ.आदिती तटकरे व युवकांचे प्रेरणास्थान आ.अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून सदरचे प्रशासकीय मान्यतेचे पत्र खा.सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील गीताबाग नर्सरी निवासस्थानी संपन्न झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात देण्यात आले आहे.

Exit mobile version